Tuesday, 25 October 2011

एकच पण ती


एकच पण ती.. ना  आहे एकाकी
एकच पणती.जरी न दे लकाकी
तिमिराला लढा द्यायला ती उभी..
टिम-टिम तिचा शांत या नभी..

आकाश चांदण्यांचे असू दे किती
दूरच तारे.. दूरवरचेच हे नजारे..
अंगणी आशांचे किरण जागवित.
ही पणती जिवाला गे दे उभारे..

जिवनाच्या याच रंगाचा हा गौरव
दिवाळी त्या पणती चा गं मिरव..
जरी अल्प तरी हा एक स्वल्प..
आयुष्यातला हा हसरासा संकल्प..

गुणगुणण्या आयुष्याचे हे गीत..
निभावण्यास ही सारी जनरित..
ती लढते..वा-याशी..तिमिराशी..
उजळूनी सारे.  अंधार पायाशी

चला प्रकाशाचे गीत हे गायला
पणतीचे जीवन जगायला...
आठवण करण्या या सा-याला
चला दीपावली.. साजरी करायलाप्रशांत.. विजया, जान्हवी आणि वेदांत दैठणकर

Wish you A very Happy Dipawali

No comments: