Sunday, 4 September 2011

व्हर्च्यूअल रियालिटीचा जमानाआजकालच्या मुलांना फेसबूक हे नवं करमणुकीचं साधन मिळालं आहे. आणि या नव्या छंदानं मुलं काही प्रमाणात वास्तवापासून दूर जात आहेत हे देखील तितकच खरं आहे हे आपण कबूल करायलाच हवं.. इथं सारं कसं गुडी गुडी असल्यानं आपला इगो सुखावला जात असल्याने सारे याच्या मागे आहेत हे वास्तव देखील आपल्याला विसरता येणार नाही.
कोण कुठला ओळखीत नसणारा आपल्या संपर्कात येतो आणि आपल्या भाव विश्वाचा एक भाग होतो. भावना व्यक्त होतात आणि त्याचे कौतूक होतं इथवर ठिक आहे मात्र यात किती प्रामाणिकपणा आहे याला तपासण्याचं ज्ञान मुलांना मिळत नाही हे पालक या नात्यानं मला सातत्यानं वाटत रहातं
व्हर्च्यूअल रियालिटीचा हा जमाना आहे. हा जमाना असा असला तरी भावना मात्र ख-या आहेत हे आपण ध्यानी ठेवायला हवं. आपण एखादा गेम संगणकावर खेळतो त्यावेळी आपणास मिळणारा जिंकण्याचा आनंद हा निश्चितपणे खरा असतो. हा आनंद वारंवार मिळावावा असं वाटतं. आपण ज्यात अधिक आनंद मिळवतो तो गेमच आपल्याला आवडतो. आपणास व्हर्च्यूअल रियालिटीच्या जगात आपल्या मतानं आणि आपल्या मनानं जगण्याचं स्वातंत्र्य असतं... वास्तवात पडेल ते दान स्वीकारावं लागतं... कायम महाभारतातल्या शकुनीमामा सारखं हक्कानं पौ-बारा दान देणारे फासे आपणाकडे असत नाहीत... हा फिल ही व्हर्च्यूअल रियालिटी आणत आहे... हा खूप मोठा धोका आहे हे आपण जाणलं पाहिजे..
व्हर्च्यूअल रियालिटीचा अतिरेक होतो त्यावेळी इगो देखील वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतो..... त्याचे फेसबूकवर हजारांहून अधिक मित्र आहेत आणि आपले फक्त तिनशे.... ही भावना आजच्या पिढीला कोणत्या वळणावर सोडणार आहे ते कळत नाही.. आहेत ते मित्र आपल्या या नव्या व्हर्च्यूअल रियालिटीच्या जगात तरी किती साथ देत आहेत हा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं..
नाही म्हणायला हा व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना जुन्या आठवणींना उजाळा देत असतो आणि काळाच्या ओघात दूर देशी गेलेल्यांना जवळ आणतो हे देखील विसरता येणार नाही.. जमा कमी आणि बाकी जादा... नेमकं काय साधतो आपण इथं यावर क्षणभर विचार करायलाच हवा ना मित्रांनो..
व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना नाकारता येणारच नाही हे खरं असलं तरी आपण व्हर्च्यूअल रियालिटी मध्ये किती आणि रियालिटीत किती जगायचं याची जाणीवच नसणा-या आपल्या नव्या पिढीला यातलं अंतर शिकवायला पाहिजे... हे अंतर त्यांच्या अंतरंगावर कायमस्वरूपी परिणाम करणारं आहे..हा व्हर्च्यूअल रियालिटीचा बुडबुडा उमलती आयुष्य पार संपवू शकतो याचीही जाण आपण ठेवावी लागेल... हा काळ बदलत आहे.. परिवर्तन ही संसार का नियम है ... भगवद् गीता सांगते... पण परिवर्तन at what cost… याचा विचार आपणच करा... जिंदगी है आपकी... चाहे वो रियालिटी हो या व्हर्च्यूअल रियालिटी....
प्रशांत दैठणकर


1 comment:

Raghavendra Ashtaputre said...

Very true Mr. Prashant. Hope, facebook lovers will think seriously on this blog. i am more concerned about parents than kids!!
Dr.Raghavendra