Friday, 26 August 2011

.... उसी आंगनमे खडा हमे देखते है ...!


                                     शहर ते जुनं आठवणीतलं, आजही उभं आहे. जरी त्याच्या राजसपणाच्या खाणाखुणा मिटल्या असल्यातरी मनातलं ते औरंगाबाद आजही डोळ्यासमोर  1979-80 चा तो काळ आणि त्या ही आधीच्या विद्यापीठ नामांतर आंदोलनाचा काळ उभा करतं.
     वडीलांच्या बदलीनंतर 1975 साली कुटुंब औरंगाबादला आलेलं. माझं पहिल्या वर्गाचं डमिशन इथलं आणि ग्रॅज्युएशनही, पुढे नोकरी मग लग्न आणि शासकीय सेवा करायला लागल्यानंतर माझी जडण-घडण आणि विकास यावर पावलोपावली औरंगाबादचा ठसा. त्यामुळे मी स्वत:ला औरंगाबादी समजतो.
     नोकरी निमित्तानं अनेकांना औरंगाबाद गाठावं लागतं तर अनेकांना सोडावं लागतं. मात्र जी व्यक्ती काही काळ औरंगाबादेत राहते त्या व्यक्तीला जगात कुठंही गेलं तर औरंगाबाद आठवत राहतं. शहरीकरण झपाट्यानं झालं तरी आपलेपणा न सोडणारं हे शहर आहे. या शहराचा हाच मॅग्नेटीझम शहराच्या विकासातला मोठा भाग आहे.
     पुण्याचं उणं काढू नये अन् मुंबई तर मोठी मायानगरीच आहे. कामकाजानिमित्त माझे अनेक मित्र शहर सोडून गेले पण ते देखील मनापासून कबूल करतील की संध्याकाळ झाली की गुलमंडीची याद येते. होळीचा रंग खेळताना याच शहराची आठवण समोर येते...
 दसरा- दिवाळी, गणपती, नवरात्र... औरंगाबाद शहर स्वत:चं असं चक्र घेऊन चालणारं शहर आहे. ही मजा इतरत्र येणं शक्यच नाही. म्हणून म्हणावसं वाटतं.          शहर एक यादोंमे बसा है
          पल पल हर पल है बुलाता
          तनहाई में याद आती है
          तो है मन मे हमे रुलाता
          इन संकरी गलीयोंमे बसने वाले
          हम दिल अपना बडा रखते है
          आँख होती है बंद जब अपनी
          खुदके उसी आंगन मे खडा देखते है
          कई बार माँ की लोरी याद आती है
          मॉ बनकर ताकती हुवी हमे
घर की वो चौखट नजर आती है

     आपलं शहर हे आपलं असतं असं म्हणतात. प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या गावाचा आदर असते कारण तिथं आठवणींचे पदर जुळलेले असतात. निखळ हास्याचे क्षण त्या घरात ज्या भिंतींनी कधी कधी मला आगतिक होवून रडतानाही बघितलय. जिवापाड जपणारी नाती आणि त्याही पल्याड प्रेम करणारे मित्र... असं प्रत्येकाचं एक शहर... माझ्यासाठी माझं औरंगाबाद.

                           प्रशांत दैठणकर
                      00000

No comments: