Friday, 1 July 2011

गो गोवा...
रस्त्याच्या दोन्ही बाजूला माडाच्या झाडांची रांग गाडी साधारण 60 कि.मी.प्रतितास वेगाने जात आहे. समोर गाडयांची लांबच लांब रांग. दुस-या बाजूनेही तिच स्थिती पण कुणी लेन कट करण्याचा प्रयत्न करीत नाही सारं कसं शिस्तीचं काम कुठेही वाहतून पोलिस नाही आणि सिग्नल देखील नाही सारं कसं आगळं आपण एखाद्या वेगळयाच देशात आहोत असं वाटांव हा प्रसंग स्मरणात राहील आणि ठिकाण आपल्याच शेजारचं राज्य गोवा गोव्यात पणजीम कडून जुन्या गोव्याकडे माझी गाडी जात होती.


महत्वाचं असं हे देशातलं पर्यटन स्थळ इंथ आपण जाऊ त्यावेळी स्वत: वाहन चालवू का? ते जमेल का? अशा प्रश्नांची मालिका डोळयासमोर होती मात्र प्रत्यक्षात गोव्यात वाहन चालवताना अतिशय सुरक्षित वाटत होत.


पाच-सहा दिवस पर्यटन करायचं म्हणून यंदा गोव्याची निवड केली मुलांचा आग्रहच होता.बांदा सोडलं आणि पणजिम 32 किमीच्या बोर्ड समोर होता गोवा मनोहारी आहे असं ऐकलं होत आता ते प्रत्यक्षात बघत होतो.


रस्त्यात कुठेही कुणी थुंकलेलं नाही कचरा नाही सारं स्वच्छ आणि निसर्गानं दिलेल हिरवाईच दान गोव्याला आणखी मनोहारी बनवत होतं. गोव्यात कलंगुटला अगदी बीच लगतच एक रिसॉर्ट मिळालं याचा आनंद होताच इतकावेळ धीर धरुन बसलेली बच्चे कंपनी रिसॉर्टला पोहचताच कपडे बदलून स्व‍िमींग टँककडे धावली


कलंगुट हे छोटंसं खेडं मात्र इथ ग्रामीण भागाच्या खाणा-खुणा दिसत नाहीत आपण युरोपातील सफरीवर आहोत असं फिरताना वाटत राहतं आणि ग्रामिण भाग आसाही असू शकतो याची अनुभूती येते.


गोव्यात पर्यअन संस्कृती पूर्णपणे रुजली आहे आपणास इथं फिरायला अॅक्टीव्हा, मोटार सायकल आणि कार दिवसभरासाठी भाडयाने मिळतात. पेट्रोलपंप नाही त्यासाठी पणजीम पर्यंत जायला लागतं पण काळजी नको इथं प्रत्येक हॉटेलमध्ये मिनरल वाटर सोबतच पेट्रोल भरलेल्या बाटल्या विकायला ठेवलेल्या आहेत.


कलंगुट बीच गोव्यातील एक गर्दीचा बीच इथं पाऊल टाकताच बच्चेकंपनी समुद्रात डुंबायला सुरवात केली. मनसोक्त डुंबणं झाल्यावर सनसेटचे फोटो घेत शांतपणे बाजूच्याच 'शॅक' वर आम्ही स्थिरावलो 'शॅक' अर्थात बीच वरचं हॉटेल.इथ धुंद होवून नाचणारे पर्यटक रात्री अकरापर्यंत सागरी खाद्याचा आनंद घेताना दिसतील.


गोव्यात आणखी एक वेगळेपणा जाणवतो तो म्हणजे छोटी दूकाने असो अथवा मोठी दुकाने इतकेच काय तर मद्यविक्रीची दुकाने सर्व ठिकाणी महिला चालक आहे. इथं मुक्तपणे मद्यविक्री होत असली तरी मद्यसेवन करुन रत्यावर गोंधळ घालताना कुणीही दिसणार नाही.


दुस-या दिवशी सकाळीच उठून कलंगुट नजिक असलेला अग्वादा किल्याकडे आम्ही निघालो पोर्तुगिज या ठिकाणी होते त्यांनी गोव्यावर राज्य केले. त्यांच्या सोयीसाठी त्यांनी हा किल्ला बांधला इंथ एक दीपगृह आहे. आता याची जागा नव्या दीपगृहाने घेतली आहे. या किल्याला मोठी खंदकाची संरक्षक फळी आहे. आतील बाजूस पाणी साठवण्यासाठी भला मोठा हौद आहे.


या किल्ल्याच्या खालच्या बाजूस डॉल्फीनची सैर करविण्या-या अनेक बोटी आणि पाण्यातून उसळी घेणारे डॉल्फीन असं विहंगम दृश्य आपणास बघायला मिळत लगतच अग्वादा तुरुंग आहे. गोवा मुक्ती संग्रामाच्या आठवणी या तुरंगाशी निगडीत आहेत.


गोव्यात विशेष जाणवतं ते म्हणजे कपडयांची विक्री करणार अधिकांश व्यापारी हे कश्मीरी आहेत तर शॅक वर आपणास पूर्वांचलातील वेटर दिसतील. कोंकणी, मराठी, हिंदी, इग्रजी, भाषांमधून सर्व व्यवहार होतात. मुंबईचा अनुभव लक्षात घेता मला गोवा आवडलं कारण आपणास टॅक्सीवाला देखील योग्य मार्गदर्शन करतो. फसवाफसवी होत नाही.


चांगल्या माणसांचा चांगला प्रांत ही ओळख गोव्याने निर्माण केली आहे. त्यामुळे विश्वासाने आपण निर्धास्त होवून पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो पत्नी विजया, मुलगी जान्हवी आणि मास्टर वेदांत यांच्यासह माझी गोवा भटकंती सुरु झाली गोवा खुप मोठं आहे त्यासाठी आणी 4 दिवस लागणार हे निश्चित होत.


-प्रशांत दैठणकर

1 comment:

Anonymous said...

काशमीर ते कन्याकुमारी झालं पण गावा जाणे बाकी आहे***शहाणे